Advertisement

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी

गुरुवारी सायंकाळी उशिरा स्थानिक पोलिसांनी या सभेला परवानगी दिली.

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी
SHARES

येत्या १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील प्रस्तावित सभेला परवानगी मिळाली आहे.

विशेषत: मनसेचा पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद उफाळला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले होते.

यासंदर्भात मनसेकडून परवानगी मिळणारच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. अखेर ती परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

खालील अटींचं करावं लागेल पालन

  • १ मे रोजी दुपारी ४.३० ते ९.४५ या वेळेत जाहीर सभा होणार आहे.
  • स्थळ आणि वेळ बदलणार नाही
  • सभेदरम्यान किंवा नंतर कोणतीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, दंगा किंवा गैरवर्तन करू नये.
  • कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वाहनांना पोलिसांनी निश्चित केलेल्या रस्त्यांचे पालन करावे लागेल आणि लेन बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • या वाहनांना शहरात प्रवेश करताना विहित वेगमर्यादा पाळावी लागणार आहे.
  • जास्तीत जास्त १५,००० लोक या ठिकाणी उपस्थित राहू शकतात.
  • अधिक लोकांना आमंत्रित केल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीला आयोजक जबाबदार असतील.
  • कार्यक्रमादरम्यान शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन होता कामा नये.
  • कार्यक्रमादरम्यान कोणतीही शस्त्रे, तलवारी, स्फोटके दाखवू नयेत.
  • कोणत्याही व्यक्तीचा किंवा समाजाचा अपमान करू नये
  • लाऊडस्पीकरच्या वापरामुळे वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन होता कामा नये.

राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून आणि उत्तर सभेतून मशिदीवरील भोंगे हटवण्यासंबंधी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला. परंतु राज ठाकरेंच्या सभेचा परिणाम उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला. तिकडे प्रार्थनास्थळावरील भोंगे विशेषत: मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात सरकारनं कडक पावलं उचलली.

गुडी पाडवा मेळाव्यातूनही राज ठाकरेंनी योगी सरकारचं कौतुक केलं होतं. आता मशिदीवरी भोंगे हटवल्यानंतर योगी सरकारचं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

राज ठाकरे यांनी आज सकाळीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं जाहीरपणे कौतुक केलं. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी अभिनंदन केलं.

"उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार" असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं. याशिवाय याच ट्विटमधून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

"आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी, महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना" असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.



हेही वाचा

राज ठाकरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला देणार ‘बुस्टर डोस’

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा