Advertisement

राज ठाकरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता

५ जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असतील.

राज ठाकरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता
SHARES

उत्तर प्रदेशातील बहुतांश मशिदीवरचे भोंगे उतरविल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ५ जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असतील. त्या अगोदर राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून आणि उत्तर सभेतून मशिदीवरील भोंगे हटवण्यासंबंधी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला. परंतु राज ठाकरेंच्या सभेचा परिणाम उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला. तिकडे प्रार्थनास्थळावरील भोंगे विशेषत: मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात सरकारनं कडक पावलं उचलली.

गुडी पाडवा मेळाव्यातूनही राज ठाकरेंनी योगी सरकारचं कौतुक केलं होतं. आता मशिदीवरी भोंगे हटवल्यानंतर योगी सरकारचं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

राज ठाकरे यांनी आज सकाळीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं जाहीरपणे कौतुक केलं. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी अभिनंदन केलं.

"उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार" असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं. याशिवाय याच ट्विटमधून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

"आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी, महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना" असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.



हेही वाचा

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ : राज ठाकरे

ऐ भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से : अमृता फडणवीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा