Advertisement

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात गांधी देतायत मोदींना इतिहासाचे धडे


राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात गांधी देतायत मोदींना इतिहासाचे धडे
SHARES

पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केल्याने पटेलांवर अन्याय झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्यावर घणाघाती टीका केली. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून इतिहासाची आठवण पंतप्रधान मोदींना करून दिली आहे. या व्ययंगचित्रातून राज यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.

राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रकट झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी महात्मा गांधी भारताचा इतिहास नावाचे पुस्तक हातात घेतलं आहे. यामध्ये त्यांच्या समोर बसलेल्या मोदी आणि अमित शाह यांना इतिहासाचे धडे देत असून, नेहरू यांना काँग्रेसने नव्हे तर आपणच पंतप्रधान केल्याचे सांगत आहेत. तसेच नेहरू हे जरी गृहमंत्री असते तरी ते काँग्रेसचे नेते असल्याचं या व्यंगचित्रातून ठणकावून दाखवण्यात आलं आहे. गांधीजींचे हे वक्तव्य ऐकल्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे चेहरे पाहण्यासारखे झाल्याचे दिसत आहे.

भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापांची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली. दरम्यान, हा विषय घेऊन राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा