राज ठाकरेंनी कापला ५१ किलोचा ईव्हीएम केक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवासानिमित्त ५१ किलोचा ईव्हीएमचा केक कापला. ५१ किलोचा हा केक मनसे कार्यकर्त्यांनी आणला होता.

SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुक्रवारी वाढदिवस पार पडला. वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत श्री. सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर राज यांनी ५१ किलोचा ईव्हीएमचा केक कापला. वाढदिवसानिमित्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी ५१ किलोचा ईव्हीएम केक आणला होता. राज ठाकरेंचा ५१ वा वाढदिवस होता, त्यानिमित्त हा केक कार्यकर्त्यांनी आणला होता.

सिद्धिविनायकाचं दर्शन

सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर राज ठाकरे यांनी साधेपणानं वाढदिवस साजरा केला. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी ईव्हीएमचा ५१ किलोचा केक घेऊन आले तेव्हा तो कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री पायल रहतोगीचा निषेध करणारा केकही यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आणला होता.

१० सभा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आणि भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र भाजपाचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी ज्या १० सभा घेतल्या त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये झालेलं पहाण्यास मिळालं नाही. त्यामुळं आता विधानसभेच्या वेळी राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

मुंबई रल्वेच्या ताफ्यात दाखल होणार २० नवीन लोकलसंबंधित विषय
ताज्या बातम्या