‘राजा’ राजावाडीत


  • ‘राजा’ राजावाडीत
SHARE

घाटकोपर - मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेकडून निवडून आलेले नगरसेवक संजय तुरडे यांच्या आनंदावर त्याच दिवशी विरजण पडलं. वॉर्ड क्रमांक 166 मधून निवडून आल्यानंतर भाजपाचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह 23 तारखेला तुरडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात तुरडे आणि त्यांचे कार्यकर्ते जबर जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांनी तुरडे आणि कार्यकर्त्यांची राजावाडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान या सर्व प्रकाराचा मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात मनसेचे 10 ते 12 कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. संजय तुरडे यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी विनोबा भावेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केलीय. तुरडे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या