SHARE

दादर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील मनसे नगरसेवकांची बैठक घेतली, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे. पण वार्डांची फेररचना झाल्यानंतर कुणाला कुठे सामावून घेता येईल याबाबत चर्चा झाल्याचं समजतं. काही दिवसांपूर्वी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि भाजपचे मुंबई उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर ही बैठक राज ठाकरे यांनी घेतली, मात्र मनसे नगरसेवक संतोष धुरी यांनी बैठकीनंतर सांगितलं की, कोणत्याही प्रकारच्या युतीसंदर्भात राज ठाकरे यांनी नगसेवकांची मतं जाणून घेतली नाहीत. त्यांनी नगरसेवकांच्या कामांचा आढावा घेतला. सर्व जण आपल्या वार्डात जोमाने कामाला लागा, असा आदेशही दिला आहे. वार्डांच्या पुनर्रचनेमुळे नगरसेवकांमध्ये कोणताही वाद नाही असा दावा वार्ड क्रमांक १८६ च्या नगरसेविका सीमा शिवलकर यांनी केला. मात्र खात्रीलायक माहितीनुसार शिवलकर यांचा सध्याचा वार्ड क्रमांक. १८७ हा नगरसेवक संतोष धुरी यांना देण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या