मुंबईकरांच्या हातात काय, घंटा ? - राज ठाकरे

 Mumbai
मुंबईकरांच्या हातात काय, घंटा ? - राज ठाकरे

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी दिवामध्ये जाहीर सभा झाली. या वेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहेत. पण मुंबईकरही या आश्वासनांच्या आकड्यात अडकत आहे. पण खरे तर मुंबईकरांच्या हातात काय लागले फक्त घंटा? असा उपरोधिक सवालही राज ठाकरेंनी केला.

राज यांनी मुख्यमंत्र्यांच्या होर्डिंगवर टीका केलीय. 'हा माझा शब्द आहे' अशा आशयाचे होर्डिंग्ज भाजपा तर्फे लावण्यात आले होते. यावर राज म्हणाले की, "सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना ही आश्वासनं कशाच्या आधारावर देत आहेत? स्वत:च्या हिंमतीवर मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा, असा टोलाही राज यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री हिंदीत भाषणं करून परप्रांतीयांना गोंजारण्याचं काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

काय म्हणाले राज ठाकरे?

 • राज ठाकरेंची परप्रांतियांवर टीका
 • परप्रांतियांमुळे वाढतेय लोकसंख्या
 • महाराष्ट्राच्या राजकारण्यांनाही परप्रांतियांचा पुळका
 • मराठी नेतेच मराठी माणसांकडे दुर्लक्ष करतात
 • महाराष्ट्रातला मराठी माणूस हतबल
 • परप्रांतीय मतांवर भाजपाचा डोळा
 • भाजप स्वत:च्या उमेदवारांना 1 कोटी रूपये देतंय
 • नोटाबंदीवर पंतप्रधान मोदी बोलायचे बंद झालेत
 • शिवसेनेची होर्डिंग्ज म्हणतात 'करून दाखवलं'. असं कुणी बोलतं का?
 • आयुक्त म्हणतात 3 महिन्यांत डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडवतो, मुख्यमंत्र्यांना एक वर्ष का लागतं?
 • तुमचा गलथान कारभार बाळासाहेबांच्या फोटोखाली दडवू नका
 • नाशिकमध्ये मी डंपिंग ग्राऊंडचं काय केलंय ते बघा
 • नाशिकमध्ये जे मी 5 वर्षांत केलं ते यांनी मुंबईत 25 वर्षांत केलेलं नाही

राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा:

https://www.facebook.com/MumbaiLiveNews/videos/1189824414465628/

Loading Comments