• अमित ठाकरेचा साखरपुडा संपन्न
SHARE

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेचा सोमवारी साखरपुडा झाला. लहानपणीची मैत्रीण मिताली बोरुडे हिच्याशी अमितचा साखरपुडा सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. यावेळी राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.मिताली बॅरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या आहे. व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या मिताली आणि अमित यांची कॉलेजपासूनची मैत्री होती. या मैत्रीचं आता लवकरच लग्नात रुपांतर होणार आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.


राज यांच्या लग्नाचा वाढदिवस

राज ठाकरे आणि शर्मिला यांच्या लग्नाचा वाढदिवसही सोमवारी ११ डिसेंबर रोजी आहे. हेच निमित्त साधत या साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या