SHARE

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा साखरपुडा सोमवारी ११ डिसेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स येथील टर्फ क्लबवर होणार आहे.  अनेक वर्षांपासूनची मैत्रीण मिताली बोरुडे हिच्यासोबत अमित ठाकरे याचा साखरपुडा सोमवारी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी होणार आहे. त्यामुळे लवकरच राज ठाकरेंच्या घरी सनई चौघडे वाजणार अाहेत.


मैत्रीचं रुपांतर प्रेमात

अमित ठाकरे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत तर मिताली बोरुडे फॅशन डिझायनर अाहे. या दोघांची फार जुनी ओळख असून या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि अाता ते विवाहात होणार आहे. मोजक्याच लाेकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीनं हा साखरपुडा पार पडणार अाहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवसही याच दिवशी आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या