मतदारांना जागृत करण्यासाठी सामाजिक संस्थाकडून रॅली

  Mumbai
  मतदारांना जागृत करण्यासाठी सामाजिक संस्थाकडून रॅली
  मुंबई  -  

  चेंबूर - मतदानाच्या दिवशी अनेकांना सुट्टी असते. त्यामुळे मतदान न करताच अनेकजण ही सुट्टी घालवण्यासाठी शहराबाहेर जात असतात. त्यामुळे आपलाच तोटा होत असतो. हीच बाब मतदारांना समजावून सांगण्यासाठी शनिवारी चेंबूरमधील इलेवन पिलर आणि प्रिअमियो या सामजिक संस्थानी चेंबूर परिसरात जनजागृती रॅली काढली होती. तसेच एखादा उमेदवार चांगला नसेल तर नागरिकांसाठी नोटाचा देखील पर्याय असल्याचे सांगत नोटा बद्दल देखील या तरुणांनी रहिवाशांमध्ये जनजागृती केली. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही संस्था सामजिक कार्यात सक्रिय असून, यापुढे देखील मतदानाबाबत वारंवार जनजागृती करणार असल्याचे मत यावेळी इलेवन पिलरचे अध्यक्ष प्रमोद देवाडिगा यांनी व्यक्त केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.