ठाकूर- गुप्ता आमनेसामने

 Kandivali
ठाकूर- गुप्ता आमनेसामने
ठाकूर- गुप्ता आमनेसामने
See all

अशोकनगर - मुंबई महापालिकेत नव्याने वाढलेले प्रभाग आणि बदललेले आरक्षण यामुळे नगरसेवकांची चांगली तारांबळ उडालीय. ओबीसी आरक्षणामुळे कांदिवलीतील प्रभाग 26 चे नगरसेवक सागरसिंग ठाकूर यांना आपला प्रभाग सोडावा लागलाय. त्यामुळे ते नव्याने झालेल्या प्रभाग 29 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. कांदिवली पूर्वकडील अशोकनगर, वडारपाडा हा नवीन प्रभाग रचनेनुसार 29 वा प्रभाग आहे. याच प्रभागातून काँग्रसेचे नगरसेवक रामअशिष गुप्ता निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे एकेकाळी एकमेकांचे घनिष्ठ असलेले ठाकूर आणि गुप्ता येत्या पालिका निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत.

'प्रभाग 29 मधील अर्ध्याहून अधिक भाग हा जुनाच आहे. त्या मुळे कोणीही समोर उभे राहिल्यास विजय माझाच असल्याचा विश्वास नगरसेवक रामअशिष गुप्ता यांनी व्यक्त केलाय. तर प्रभागात ओबीसी आरक्षण आल्यानं मला प्रभाग सोडावा लागलाय. मी 29 मधून निवडणुक लढवण्यास इच्छूक असून अजून अंतिम निर्णय झाला नसल्याचं नगरसेवक सागरसिंग ठाकूर यांनी म्हटलंय.'

Loading Comments