ठाकूर पिता-पुत्र भाजपात

Kandivali
 ठाकूर पिता-पुत्र भाजपात
 ठाकूर पिता-पुत्र भाजपात
See all
मुंबई  -  

कांदिवली - काँग्रेसचे माजी आमदार रमेश सिंग ठाकूर यांनी बुधवारी संध्याकाळी मुलगा नगरसेवक सागर ठाकूरसह भाजपात प्रवेश केला. दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपे नेते रावसाहेब दानवे, भाजप मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी, कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर रमेशसिंग ठाकूर यांचा भाजपात प्रवेश हा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का आहे. कांदिवली पूर्वेकडे ठाकुरांचे वर्चस्व व कांदिवली पूर्वेकडील भाजपची वाढते वजन पाहता महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसला कांदिवलीत आपले वर्चस्व कायम ठेवणे फारच कठीण आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.