सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा हडप

 Chembur
सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा हडप

नागाबाबानगर - राजकीय पक्ष हे राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी स्थापन केले जातात. तसंच राजकीय आणि सामाजिक समस्यांचे निर्मूलन त्यांच्या माध्यमातूनच केले जाते. पण त्यांच्या अजब राजकारणाचं दर्शन जनतेला होत आहे. चेंबूरच्या नागाबाबानगरमधील वाशीनाका इथं असाच प्रकार बघायला मिळत आहे. राष्ट्रीय भिमसेनेच्या कार्यकर्त्यांनी येथे प्रथम छोट्या स्वरुपात कार्यालय उभारले. मात्र कुणीही त्याबाबत वाच्यता करत नाही हे पाहून त्याचं रुपांतर पक्क्या बांधकामात केलं. इतकंच नाही तर त्याला ग्रिल देखील बसवले. असं हे शासनाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून जागा हडप करण्याचं अजब राजकारण. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याबाबात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता नितीन गायकवाड यांना संपर्क केला असता 'आम्हाला या संदर्भात काहीही माहिती नसून' 'संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल' असं त्यांनी सांगितलं.

Loading Comments