रेशनकार्ड कार्यालय आपल्या दारी

Mumbai
रेशनकार्ड कार्यालय आपल्या दारी
रेशनकार्ड कार्यालय आपल्या दारी
रेशनकार्ड कार्यालय आपल्या दारी
रेशनकार्ड कार्यालय आपल्या दारी
रेशनकार्ड कार्यालय आपल्या दारी
See all
मुंबई  -  

भोईवाडा - भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र. 202च्या महिला उपाध्यक्षा विशाखा जगताप यांच्या वतीने रेशन कार्ड कार्यालय आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भोईवाडा येथील मातोश्री एस. आर. ए. गृहनिर्माण संस्था इमारत क्र. 1 ते 5 च्या पटांगणात हा कार्यक्रम झाला.

या ठिकाणी राहणारे रहिवासी पूर्वी झोपडपट्टी आणि चाळीत राहणारे होते. मात्र झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत या नागरिकांना मातोश्री गृहनिर्माण संस्था इमारतीत घरं मिळाली. त्यामुळे रेशनकार्डावरील पत्यात बदल ही मुख्य समस्या निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर पत्ता बदल, कार्डप्रमुखाच्या नावात बदल आणि नाव कमी करणं अशा कामांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्डावरील पत्ता रेशनकार्ड कार्यालयातून दोन दिवसांत बदलून कार्ड नागरिकांना घरपोच देण्यात येतील, असं जगताप यांनी सांगितलं. या वेळी संपर्कप्रमुख जगदीश चांदोरकर, विनोद सोनवणे, मंगेश जगताप आदी उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.