अनुकंपाधारकांचे आमरण उपोषण

 Azad Maidan
अनुकंपाधारकांचे आमरण उपोषण

सीएसटी - राज्य सरकारमधील विविध विभागातील मयत कर्मचाऱ्यांचे वारसदार हे अनुकंपा तत्वाच्या नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे या वारसदारांनी आझाद मैदानात उपोषण केलंय.

महाराष्ट्रातील गेल्या 5 वर्षातील प्रतिक्षा यादीतील अनुकंपाधारकांना त्वरीत विना अट नियुक्ती दयावी. शासन निर्णय 23 एप्रिल 2008 नुसार 2005 पूर्वीच्या 50 टक्के उमेदवारांच्या नियुक्ती पहिल्या वर्षी, 25 टक्के दुसऱ्या वर्षी, तर उर्वरित 25 टक्के तिसऱ्या वर्षी करण्याचे तात्काळ आदेश देण्यात आले होते. तशी नियुक्ती करावी अशा मागण्या या उमेदवारांनी केल्या आहेत.

शासनाच्या नियमानुसार अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, यासाठी 2006 पासून अनेक जण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. तर, काहींचे 45 पेक्षा अधिक वय झाल्यामुळे ते बाद झाले आहेत.

Loading Comments