Advertisement

मृत्यूसाठी डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत?


मृत्यूसाठी डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत?
SHARES

चुनाभट्टी - येथील पाईप लाईन परिसरात राहणारे शिवसेना उपशाखाप्रमुख हरी भीमराव जोगदंडकर (वय 38) यांचा मंगळवारी पहाटे अचानक मृत्यू झाला. मृत्यूचे कारण डॉक्टरांनी स्पष्ट केले नाही. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप जोगदंडकर यांच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याऐवजी मयत ताब्यात घ्या आणि एका खाजगी डॉक्टरांकडून मयत झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन मयतावर तत्काळ अंतिमसंस्कार करा असा सल्ला दिल्याने वातावरण पेटले असून मयत जोगदंडकर यांचे शव शवविच्छेदनासाठी सायन रुणालयात नेण्यात आले. मात्र शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे रुग्णालयाच्या वतीने नातेवाईकांना सांगिण्यात आले.

मंगळवारी पहाटे 3.30 वाजता हरी जोगदंडकर यांना पोटात दुखत असल्याने घराजवळच्या सोमय्या रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. तब्बल दोन तास रुग्ण तळमळत होता. मात्र कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करण्याऐवजी वेळकाढूपणा केला. त्यामुळे आजार अधिक बळावला आणि जोगदंडकर यांना अतिदक्षता विभागात तत्काळ हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

काही महिन्यांपूर्वी मयत हरी जोगदंडकर यांनी सोमय्या रुग्णालयातील गैरसोयीबाबत काही शिवसैनिकांसह आवाज उठवला होता. त्यावेळी अधिष्ठातांसमोर रुग्णालयातील गैरसोयीचा पाढा वाचून रुग्णालय व्यवस्थापन त्यांनी हादरून सोडले होते. याचाच राग मनात ठेवून हरी जोगदंडकर यांना डॉक्टरांनी वेळेवर उपचार दिले नाहीत असा आरोप रुग्णाचे नातेवाईक नंदू प्रभू शिंदे यांनी केला असून, शवविच्छेदनात काही संशयास्पद आढळल्यास रुग्णालयातील डॉक्टरांवर पोलीस कारवाई करू असेही शिंदे म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा