Advertisement

गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती - चंद्रकात पाटील


गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती - चंद्रकात पाटील
SHARES

मुंबई - गोवा महामार्गाची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 5 ऑगस्टपर्यंत किंवा उशीरात उशीर 15 ऑगस्टपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. तसेच मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचा पनवेल ते इंदापूर हा पहिला टप्पा मार्च - 2018 पर्यंत तर, इंदापूर - झाराप हा दुसरा टप्पा मार्च - 2019 पर्यंत होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित करुन मुंबई - गोवा महामार्गाची चाळण झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यामुळे सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या 5 ऑगस्ट पर्यंत दुरुस्ती करणार असल्याच्या दाव्यावर शंका उपस्थित करत ठेकेदारांकडून हे काम होणार नसल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, एकावेळी दोन ठेकादारांकडून काम करुन घेतले जात आहे. तसेच काम तपासूनच पेमेंट दिले जाणार असल्याची माहिती चंद्रकात पाटील यांनी दिली.


यंदाही पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी?

मागच्या वर्षी गणेशोत्सव काळात पुणे द्रुतगती मार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांना टोलमाफी दिली गेली होती. त्याप्रमाणेच यंदाही टोलमाफी दिली जावी अशी मागणी निलम गोऱ्हे यांनी केली. त्याप्रमाणे यावर्षी टोलमाफी देण्याचा प्रयत्न करु, अशी माहिती अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.



हे देखील वाचा -

यंदाचा गणेशोत्सव ठरणार जगातील सर्वात मोठा महोत्सव



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा