Advertisement

काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोडसाळपणाच्या- आनंदराज आंबेडकर

आपल्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोडसाळपणाच्या असल्याचा खुलासा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी केला.

काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोडसाळपणाच्या- आनंदराज आंबेडकर
SHARES

आपल्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोडसाळपणाच्या असल्याचा खुलासा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी केला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश’ अशा मथळ्याच्या बातम्या काही प्रसिद्धी माध्यमात रविवारी छापून आल्या होत्या. त्यावर स्वत: आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं.


काय म्हणाले आनंदराज?

''माझ्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाच्या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही. काही जणांकडून जाणीवपूर्वक आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच माझ्या काँग्रेस प्रवेशाची अफवा पसरवण्यात आली. दिल्लीत आम्ही कुठलाही उमेदवार दिलेला नाही. कारण दिल्लीत आमची ताकद नसल्याने आम्ही दिल्लीचं युनिटही बरखास्त केलं आहे. एवढंच काय तर मी गेल्या ८ दिवसांपासून मुंबईतच आहे. त्यामुळे मी दिल्लीत जाण्याचा प्रश्नच येत नाही.'', असं स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिलं.


वंचित बहुजन आघाडीकडूनही खुलासा

''आनंदराज आंबेडकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश या बातमीला कुठलाही आधार नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे उदितराज आहेत, आनंदराज नाही. त्यामुळे चुकीचं वृत्त देणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकू'' असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे म्हणाले.


काय आहे प्रकरण?

आनंदराज आंबेडकर यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशा आशयाच्या बातम्या रविवारपासून काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.



हेही वाचा-

'मोदी तुम्हाला देश माफ करणार नाही', - राज ठाकरे

माझ्या आत्मचरित्रातून कळेल शिवसेना सोडण्यामागचं खरं कारण- राणे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा