क्रिकेटच्या मैदानात आठवलेंचं राजकारण

Pali Hill, Mumbai  -  

दादर - रामदास आठवले हे नेहमी आपल्या वक्तव्यं आणि कवितांमुळे चर्चेत आलेत. मात्र या वेळी त्यांनी दलित कार्ड पुढे केलंय आणि तेही क्रिकेटमध्ये. भारतीय क्रिकेट संघाचा बऱ्याच वेळा पराभव होतो. या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर टीम इंडियामध्ये दलितांना कोटा असणं गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केलीय. दरम्यान आधी बीसीसीआयचं भिजत पडलेलं घोंगडं निस्तरा अशी प्रतिक्रिया माजी कसोटीपटू प्रविण आमरे यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना दिलीय. खेळाडूंनी मात्र क्रिकेटमध्ये जातीयवाद आणू नका अशी मागणी केलीय. राज्यात आरक्षणासाठी वेगवेगळ्या समाजाचे मोर्चे निघत आहेत. यातच आता भारतीय संघात आरक्षणाची मागणी करून रामदास आठवलेंनी नव्या वादाला तोंड फोडलंय.

Loading Comments