Advertisement

लसींसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं, रोहित पवारांचा विरोधकांना सल्ला

केवळं टीका करणारं पत्र लिहिण्यापेक्षा लसींची मागणी करण्यासाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.

लसींसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं, रोहित पवारांचा विरोधकांना सल्ला
SHARES

महाराष्ट्रासह मुंबईतील प्रशासनाच्या कोरोना लढ्यावर विरोधक भाजपकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर कोरोना प्रतिबंधक लसी, रेमडेसिवीर सारखी औषधं, आॅक्सिजन इ. अपुऱ्या साधनसामुग्रीच्या आधारे प्रशासनाचा लढा सुरूच आहे. अशा वेळी केवळं टीका करणारं पत्र लिहिण्यापेक्षा लसींची मागणी करण्यासाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.

कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!

आणि कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळेच हे शक्य, इक्बाल सिंह चहल यांचं मोठं विधान

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणं, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभं करणं आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास आणता लढ्यात बाधा उत्पन्न करण्याचे प्रकार सुरू आहेत. कोरोना आकड्यांतील ही बनवाबनवी ताबडतोब थांबवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांचं कौतुक करतात, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत जाहीररित्या मुंबई महापालिका प्रश्नाासन आणि आयुक्तांचं कौतुक करतात. असं असताना केवळ टीकेसाठी टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर मिळाल्याचं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

(rohit pawar criticized devendra fadnavis on mumbai covid 19 situation)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा