Advertisement

पेंग्विनायण सुरूच


पेंग्विनायण सुरूच
SHARES

मुंबई - पेंग्विनायण काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. पेंग्विन मृत्यूप्रकरणाबरोबरच पेंग्विनच्या खरेदीतही घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांनी पुन्हा शिवसेनेवर बाण रोखला आहे. पेंग्विन खरेदीच्या करारनाम्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यावर कंत्राटदाराची सही नसल्याचाही खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. तर याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचेही म्हणत याप्रकरणाच्या चौकशीची मागणी हरकतीच्या मुद्दयाद्वारे स्थायी समितीत केली आहे.

पेंग्विनचा विषय मागील सभेत झाला असून आता पुन्हा याविषयावरील चर्चेची गरज नसल्याचे म्हणत अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हा विषय बाजुला सारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा विषय सत्ताधाऱ्यांच्या अगंलट येणार असल्यानेच यावर चर्चा होऊ दिली जात नसल्याचे म्हणत चौकशीच्या मागणीवर छेडा ठाम राहिले. त्यामुळे अध्यक्षांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा