आगामी निवडणुकीत रिपाइं भाजपासोबत

 Fort
आगामी निवडणुकीत रिपाइं भाजपासोबत

मुंबई - आगामी पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रिपाइंने भाजपसोबत युती करणार असल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची चर्चा झाली. त्यात 10 महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीत युतीची प्रक्रिया सुरु करण्यात यावी असा निर्णय झाला. तशा सूचना दोन्ही पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हापरिषद आणि 10 महानगरपालिकांमध्ये गेल्यावेळी वाटाघाटीत 29 जागा मिळाल्या होत्या. आता त्यापेक्षा अधिक मागणी करणार आहोत. रिपब्लिकन पुर्नबांधणी गट विसर्जित करून त्याचे रिपाइंत विलीनीकरण करण्यात आले आहे. त्या पक्षाचे प्रमुख काकासाहेब खांबाळकर यांनी कार्यकर्त्यांसह रिपाइंत प्रवेश केला आहे. त्यांना रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देण्यात आले असल्याची माहिती रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर यांनी दिली.

Loading Comments