रिपाइंला अखेर 25 जागा

  Mumbai
  रिपाइंला अखेर 25 जागा
  मुंबई  -  

  सीएसटी - मुंबई महापालिका निवडणुकीत रिपाइं लढवत असलेल्या 25 जागांपैकी 19 जागांवर निवडून येणार असल्याचा विश्वास रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी व्यक्त केला. आझाद मैदानाजवळील रिपाइं कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  मुंबई पालिका निवडणुकीत भाजपा आणि आठवले गट यांची युती झाली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आठवले गट यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर भाजपाने 25 जागा रिपाइंला सोडल्याचे सांगितले. रिपाइंने एकूण 65 जागा मागितल्या होत्या. मात्र आता रिपाइंला 25 जागा मिळणार असल्याने उर्वरित उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचे आणि भाजपाचे उमेदवार आरपीआयला सेाडलेल्या जागेवर माघार घेणार असल्याचे सोनावणे यांनी म्हटले.

  या वेळी अविनाश महातेकर, तानसेन ननावरे, सुमंतराव गायकवाड, एस. एस. यादव आदी रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.