लोकसभेत रामदास आठवले यांची हास्य मैफील; मोदींसह राहुल, सोनिया गांधीही खळखळून हसल्या

रामदास आठवले यांनी ‘एका देशाचं नाव आहे रोम, लोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ कवितेची ही पहिली ओळ उच्चारताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकलं.

SHARE

राजस्थानातील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक खासदारांनी त्यांचं अभिनंदन केलं. तसंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीतून 'परफेक्ट मॅन' म्हणत बिर्ला यांचं अभिनंदन केलं.

स्मित हास्य

खासदारांनी बिर्ला यांचं अभिनंदन केल्यानंतर लोकसभेत रामदास आठवले उभे राहिले आणि त्यांनी अभिनंदनाच्या कवितेचं सादरीकरण सुरू केलं. ‘एका देशाचं नाव आहे रोमलोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ कवितेची ही पहिली ओळ आठवले यांनी उच्चारताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकलं.


आठवलेंची कविता 

एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिड़ला ओम
लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैक लिस्ट में डालना है नाम
नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल
हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल
आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान
भारत की हमें बढ़ानी है शान,
लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन’हेही वाचा -

शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

म्हाडाची मास्टर लिस्ट आता आॅनलाइन, रहिवाशांची फसवणूक थांबवणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या