2000 च्या नोटेचा रिअॅलिटी चेक

मुंबई - सरकारने 500-1000 च्या नोटा बंद करून चलनात 2000 ची नवी नोट आणली. मात्र या नवीन नोटी बाबत अनेक चित्रविचित्र चर्चा समोर येऊ लागलेय. काहींनी तर 2000 च्या नोटेचा रंग जात असल्याची तक्रार केली. यासाठी मुंबई लाईव्हनं नोटेचा रिअॅलिटी चेक केला. आमच्या प्रतिनिधीनं 2000, 500, 50, 100 आणि पाच रुपयांच्या नोटा चेक केल्या. त्यावेळी असं लक्षात आलं की पाण्याने सगळ्याच नोटांचा रंग जातोय. त्यामुळे मुंबई लाईव्ह तुम्हाला आवाहन करतंय की 2000 च्या नोटेचा रंग जातोय ह्या पसरवलेल्या अफवेवर लक्ष देऊ नका. भारतीय नोटांचाच नाही तर डॉलर्सचाही रंग जातोय. म्हणूनच आम्ही सरकारलाही सांगू इच्छितो की, अशा अफवा पसरत आहेत, त्या रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. जेणेकरून अशा अफवांना लोकं बळी पडणार नाहीत. 

Loading Comments