Advertisement

'आरएसएस'ही देणार इफ्तार पार्टी!

भाजपानं मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न अखेर सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून की काय कट्टर हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे मुंबईत पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे.

'आरएसएस'ही देणार इफ्तार पार्टी!
SHARES

लोकसभा-विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने भाजपानं मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न अखेर सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून की काय कट्टर हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे मुंबईत पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे. सह्याद्री अतिथी गृह इथं ही इफ्तार पार्टी रंगणार असून या इफ्तार पार्टीकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.


मतदारांना आकर्षित करण्यासाठी?

मुंबईत मोठ्या संख्येने मुस्लिम आणि दलित मतदार आहेत. या मतदारांना आपलंस करून घेण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी २०१५ मध्ये भाजपा-आरएसएसकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येणार होतं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इफ्तार पार्टी घेण्यास नकार दिल्याने इफ्तार पार्टीची योजना बारगळली. मात्र आता निवडणुका जवळ आल्यानेच मुंबईत इफ्तार पार्टी आयोजित करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. हा मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा डाव असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


कधी होणार आयोजन?

४ जून रोजी होणाऱ्या या इफ्तार पार्टीला देशभरातील मुस्लिम नेते आणि राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेतच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ३० देशांमधील मुस्लिम नेते, राजनैतिक अधिकारी असे एकूण २०० व्यक्तींना इफ्तार पार्टीचं निमंत्रण देण्यात आल्याचं समजतं आहे. त्यामुळं ही इफ्तार पार्टी चांगलीच रंगणार असल्याचीही चर्चा आहे.


मंचने आतापर्यंत उत्तर भारतात अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. मुंबईतही मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव वास्तवास आहेत. सिनेमा क्षेत्रात आघाडीचे मुस्लिम कलाकार आहेत. बोहरी मुस्लिम व्यापारी या शहरात पिढ्यान पिढ्या राहत आहेत .या सर्व समाजबांधवांना एका मंचावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- इरफान पिरजादे, संयोजक मंच



हेही वाचा-

'पालघरमध्ये एका रात्री इतकी मतं वाढली कशी?' - शिवसेना



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा