Advertisement

'पालघरमध्ये एका रात्री इतकी मतं वाढली कशी?' - शिवसेना

शिवसेनेनं 'सामना' या आपल्या मुखपत्रातून 'एका रात्रीच ८२ हजार मतं कशी वाढली?' असा सवाल उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेवर आणि भाजपाच्या नितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

'पालघरमध्ये एका रात्री इतकी मतं वाढली कशी?' - शिवसेना
SHARES

पालघर लोकसभा पोटनिवडणुकांसाठीचं मतदान पार पडल्यानंतरही भाजपा आणि शिवसेनेचा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा सामना मात्र काही संपताना दिसत नाही. शिवसेनेनं 'सामना' या आपल्या मुखपत्रातून 'एका रात्रीच ८२ हजार मतं कशी वाढली?' असा सवाल उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेवर आणि भाजपाच्या नितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.


पालघरमध्ये ४६.५० टक्के मतदान

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान पार पडलं. मात्र मतदानावेळी अचनाक २७६ ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशिन बंद पडल्यानं कित्येक मतदारांना नाराज होत घरी परतावं लागलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ मशिन बदलून घेत मतदान घेतलं. पण याचा मतदानावर परिणाम झालाच आणि त्यामुळे एकूण ४६.५० टक्के इतकं मतदान झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलं.


मग मतं कशी वाढली?

मतदान झालेल्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी अचानक एक पत्रक काढत एकूण ५३.२२ टक्के मतदान झाल्याचं जाहीर केलं. आतापर्यंतच्या निवडणुकांचा अऩुभव लक्षात घेता मतदानाचा अंतिम आकडा जाहीर करताना १ ते २ टक्क्यांचा फरक पडतो. पण इथं मात्र सहा टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? एका रात्रीत ६.७२ टक्के म्हणजे अंदाजे ८२ हजार मतं कशी वाढली? असा सवाल शिवसेनेनं सामनामधून उपस्थित केला आहे.


राजकारण पेटण्याची शक्यता

सोमवारच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार ८ लाख ४ हजार ९५० मतदारांनी मतदान केलं. तर मंगळवारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार ८ लाख ८७ हजार ६८७ मतदारांनी मतदान केल्याचं नमुद केलंं. म्हणजेच एका रात्रीत तब्बल ८२ हजार ७३७ मत वाढल्यानं शिवसेनेनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर ही मत कशी वाढली? असा सवाल करत ही मते कुणाला तारणार असाही प्रश्न उपस्थित केला आहे. 

ईव्हीएम मशिनमधील हा घोळ असून निवडणूक यंत्रणेला हाताशी धरत रचलेलं हे षडयंत्र असल्याचाही आरोप शिवसेनेनं केला आहे. त्यामुळे आता यावरूनही चांगलंच राजकारण पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


हेही वाचा - 

पालघर पोटनिवडणूक : ईव्हीएम मशिन खासगी कारमध्ये सापडली

पालघर पोटनिवडणूक: ७ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा