Advertisement

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीत 56 टक्के पदं रिक्त


शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीत 56 टक्के पदं रिक्त
SHARES

गोरेगाव - शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित कंपनीत 56 टक्के पदं भरलीच गेली नाहीत, ही बाब आता माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे.
शिवशाही पुर्नवसन प्रकल्प मर्यादित कंपनीत किती पदं मंजूर झालीत आणि किती पदं रिक्त आहेत, याचा तपशील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितला होता. सदर कंपनी महाराष्ट्र शासनाची असून या कंपनीची स्थापना 25 सप्टेंबर 1998 ला शिवसेना-भाजपा युती शासन कार्यकाळेत झाली होती. या कंपनीचा उद्देश गरिबांस स्वस्तात घर उपलब्ध करून देणे असा आहे.
त्यामुळं गोरगरिबांना स्वस्तात घरं मिळण्यासाठी सदर कंपनीतील रिक्त पदं तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
शिवशाही पुर्नवसन प्रकल्प मर्यादित कंपनीच्या जन माहिती अधिकारी आणि सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन) सुगंधा पवार यांनी कळवले की सर्व प्रकारचे एकूण 73 पदं आहेत. ज्यांपैकी फक्त 32 पदं कार्यरत असून 41 पद रिक्त आहेत. यात सर्वाधिक रिक्त पदं उप समाज अधिकारी यांची आहेत. 11 पैकी फक्त 4 पदावर अधिकारी कार्यरत आहेत.

रिक्त पदं
स्टेनोची 4 पैकी 4 पदे
म्हाव्यवस्थापकांची 3 पैकी 2 पदं
व्यवस्थापकांची 4 पैकी 3 पदं
सह व्यवस्थापकीय संचालक,
सर्व्हेयर, अधीक्षक, लेखा अधिकारी,
जनसंपर्क अधिकारी, उप-मुख्य अभियंता,
सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता
तंत्र सहायक, वास्तुविशारद, डीआयएलआर,
समाज विकास अधिकारी, सिलेक्शन ग्रेड स्टेनो,
झेरोक्स ऑपरेटर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा