SHARE

मुंबई - नवीन रेल्वे स्टेशनचे नाव ‘ओशिवरा’ असे अपेक्षित असताना मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या स्टेशनचे नांमकरण ‘राम मंदिर स्टेशन’ असे करुन निवडणूक जिंकण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा रामाच्या नावाचे भांडवल करण्याचा प्रयत्न सुरु झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामाजिक वातावरण दुषित करुन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न या पक्षाकडून केला जात आहे. तरी जनतेने सावध रहावे असे आवाहन नवाब मलिक यांनी केलंय. गोरेगाव ते जोगेश्वरीच्या दरम्यान नवीन रेल्वे स्टेशन निर्माण करण्याचा निर्णय युपीए सरकारच्या काळात घेण्यात आल्याचं नवाब मलिक यावेळी म्हणालेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या