Advertisement

अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल

मनसेच्या अंतर्गत गटबाजीला वैतागून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातच रुपाली पाटील यांनी पक्षाला धक्का दिला. मनसेच्या अंतर्गत गटबाजीला वैतागून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुरूवारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी पाटील, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रुपाली पाटील यांच्यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

''मी मनसेचा राजीनामा देत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला त्याबद्दल मी आभारी आहे. अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सतत त्यावर पक्षात आक्षेप घेतला जात होता. पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी कधीही पक्षीय भेदभाव केला नाही. मात्र माझ्याच पक्षातील अनेकांना ते खटकत होते. मी ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवत होते तसेच यापुढे मी काम करणार आहे. यापुढे पुणे शहरात भव्य मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला दिसेल'', असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं.

"आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे 'हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे 'पाय' दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार...", असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा