घोषणाबाजाीने घुमला मेट्रो परिसर

 Fort
घोषणाबाजाीने घुमला मेट्रो परिसर
Fort, Mumbai  -  

मेट्रो - मुंबईमध्ये शुक्रवारी एल्फिस्टन महाविद्यालयात उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना, भाजपा, मनसेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणांनी मेट्रो परिसर दणाणून सोडला. 225 प्रभागातून काँग्रेसच्या अंजना चाबुकस्वार, 226 सुषमा शेखर, 227 मधून पूरण दोषी या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपातर्फे प्रभाग 225 योजना ठोकळे, 226 हर्षीदा नार्वेकर, 227 मकरंद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या प्रभाग 225 मधून सुजाता सानप, 226 स्मिता पवळे, 227 अरविंद राणे यांनी उमेदवारी अर्ज भरले. तसेच अपक्ष उमेदवारांनी देखील फॉर्म भरले.

Loading Comments