सब का साथ, सबका विकास

 Mumbai Port Trust
सब का साथ, सबका विकास
Mumbai Port Trust  -  

मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या कालावधीतील यशाची मोजणी करण्यासाठी 'सबका साथ, सबका विकास' या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने मंगळवारी संध्याकाळी यशवंत नाट्य मंदिर येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, नगरसेवक कृष्णा रेड्डी, भाजप आमदार तमिल सेलवन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुनील राणे, बबन ठाकूर, के. सी. पारेख आदी मान्यवर उपस्थित होते.

3 वर्षात सत्तेवर आल्यानंतर जनतेसमोर जाऊन पूर्ण लेखा-जोखा देणे हे मोदी सरकारने पहिल्यांदाच केले आहे. 3 वर्षात मोदींना एकदाही विश्वास मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागली नाही. सरकार पदोपदी विश्वास संपादित करत चालेल आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

मुंबईहून एलिफंटाला जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती होणार आहे. पोर्ट ट्रस्टला व्यवसाय -17 चा पुरस्कार मिळाला आहे. लोकांचा त्रास कमी करण्यासाठी मेट्रोचे 5 प्रोजेक्ट तयार करत आहोत. त्यामुळे लोकलवरील ताण कमी होईल. सुरेश प्रभू यांच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली आहे, तोही लवकरच सुरू होईल. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये निघणाऱ्या जागा मुंबईकरांना मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेलार म्हणाले.

Loading Comments