Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर


राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे राज्य निवडणूक निर्णय अधिकारी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली.


आमदार दिलीप वळसे यांनी मुंबई अध्यक्ष निवडीसाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी, प्रमुख नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्वसंमतीने विद्यमान अध्यक्ष सचिन अहिर यांनाच मुंबई विभागीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात अाला.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२०२० अशी पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून या निवडणूकीचे राज्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आमदार दिलीप वळसे पाटील यांनी काम पाहिले.


हेही वाचा -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी अहिर विरूद्ध पावसकर

विधान परिषद निवडणूक निकाल : कुणी मारली बाजी, कुणाचा उडाला धुव्वा?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा