Advertisement

विधान परिषद निवडणूक निकाल : कुणी मारली बाजी, कुणाचा उडाला धुव्वा?

विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल अखेर जाहीर झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस यांनी शिवसेनेचा गड राखत बाजी मारली. तर मुंबई शिक्षक मतदार संघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी तिसऱ्यांदा निवडून येत विजयी घोडदौड कायम राखली आहे.

विधान परिषद निवडणूक निकाल : कुणी मारली बाजी, कुणाचा उडाला धुव्वा?
SHARES

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल अखेर जाहीर झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस यांनी शिवसेनेचा गड राखत बाजी मारली. तर मुंबई शिक्षक मतदार संघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी तिसऱ्यांदा निवडून येत विजयी घोडदौड कायम राखली आहे.



पोतनीस यांना इतकी मतं

मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाची चांगलीच दमछाक उडाली आहे. गुरूवारी झालेल्या या मतमोजणीत शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी भाजपाच्या अमितकुमार मेहता यांचा ११,६११ मतांनी पराभव केला. यावेळी भाजपाच्या अमितकुमार मेहता यांना ७७९२ मतं मिळवली.

Image result for कपिल पाटील


कपिल पाटील यांची हॅट्ट्रिक

मुंबई शिक्षक मतदार संघात भाजपा आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कपिल पाटील यांच्या पराभवासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र कपिल पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत भाजपाचा डाव मोडीत काढला. यावेळी कपिल पाटील यांच्यासमोर भाजपाचे अनिल देशमुख, सेनेचे शिवाजी शेंडगे रिंगणात होते. कपिल पाटील यांना 4050, शिवाजी शेंडगेंना 1736 तर अनिल देशमुख यांना 1124 मते मिळाली आहेत.


Image result for निरंजन डावखरे


निरंजन डावखरेंची बाजी

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली आहे. डावखरे यांनी जवळचे प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेच्या संजय मोरे यांचा 2988 मतांनी पराभव केला.

कोकण पदवीधर मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत सर्व 12 उमेदवार बाद फेरीत बाद झाले. बाद फेरीनंतर दुसऱ्या क्रमांकवरील संजय मोरे यांची 24,704 मते ट्रान्सफरसाठी घेण्यात आली.


पहिल्या फेरीत 'इतकी' मतं

पहिल्या फेरीत डाखरेंना 10,304 मोरेंना 9, 494 मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीनंतर डावखरे यांना 11,180 आणि मोरे यांना 8,997 मतं मिळाली होती. तिसऱ्या फेरीत डावखरेंनी निर्णायक आघाडी घेतली. या फेरीत त्यांना 28,945 तर मोरेंना 23,211 मते मिळाली. या फेरीत डावखरे हे 5,734 मतांनी आघाडीवर होते.


अखेर डावखरे विजयी

मात्र कोटा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेली मतं न मिळाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सुमारे अडीच हजाराहून अधिक मतं अवैध ठरली. दरम्यान निवडणूक आयोगाने अखेर निरंजन डावखरे यांना विजयी घोषित केलं.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांना पछाडत भगवा फडकवला. किशोर दराडे यांना 10 हजाराहून अधिक मतं मिळाली.


हेही वाचा - 

विधान परिषद निवडणूक: कपिल पाटील, विलास पोतनीस यांना विजयी आघाडी

मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा