Advertisement

मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला

मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असं म्हटलं जात असलं, तरी शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी भाजपाच्या अमितकुमार मेहता यांचा ११,६११ मतांनी पराभव करत एकहाती विजय मिळवला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ३७ हजार २३७ मतदारांनी मतदान केलं होतं.

मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला
SHARES

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस यांनी शिवसेनेचा गड राखत भगवा फडकवला आहे. गुरूवारी झालेल्या मतमोजणीत पोतनीस १९,३५४ मतांनी विजयी झाले असून भाजपाचे अमितकुमार मेहता यांना ७७९२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असं म्हटलं जात असलं, तरी शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी भाजपाच्या अमितकुमार मेहता यांचा ११,६११ मतांनी पराभव करत एकहाती विजय मिळवला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ३७ हजार २३७ मतदारांनी मतदान केलं होतं.





विधान परिषदेच्या ४ जागांसाठी सोमवारी २५ जून रोजी मतदान झालं होतं. तर गुरूवारी नवी मुंबईच्या नेरूळच्या सेक्टर २४ मधील पाम बीच रोडवरील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात मतमोजणी झाली. या मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



कपिल पाटील विजयी

दुसऱ्या बाजूला शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीचे उमेदवार कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. या मतदारसंघासाठी झालेल्या ८ हजार ३५३ मतांपैकी ३७५१ मते कपिल पाटील यांच्या पारड्यात पडली. तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांना १५३८ मते मिळाली.



''मला तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे अाभार मानतो. एका बाजूला, पैसा, सत्ता ताकद या सर्वांना पराभूत करत मुंबईच्या शिक्षकांनी मला जो कौल दिला त्याबद्दल मी कृतज्ञ अाहे. सरकार ज्या पद्धतीनं शिक्षणाचं खासगीकरण, व्यापारीकरण करत अाहे ते रोखणं ही माझ्यापुढील सर्वात मोठी लढाई अाहे. हे रोखलं नाही तर गरिबांना शिक्षण मिळणार नाही. विद्यापीठांचं खासगीकरण रोखण्यासाठी एक मोठी लढाई उभी करणं हे माझं कर्तव्य अाहे.''
- कपिल पाटील, शिक्षक भारती



निरंजन डावखरे यांची विजयी आघाडी

तर, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या दुसऱ्या फेरीत भाजपाचे निरंजन डावखरे यांनी ११,१८० मते मिळवत विजयी आघाडी घेतली आहे. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे संजय मोरे ८९९७ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघासाठी एकूण ७५ हजार ४३९ मतदारांनी मतदान केलं आहे.

निवडणुका तोंडावर असताना निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.



हेही वाचा-

विधान परिषद निवडणूक: कपिल पाटील, विलास पोतनीस यांना विजयी आघाडी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा