Advertisement

मुंबई पदवीधरसाठी ८३ टक्के मतदान


मुंबई पदवीधरसाठी ८३ टक्के मतदान
SHARES

विधान परिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी सोमवारी मतदान पार पडलं.  मुंबई शिक्षक मतदारसंघात ८३.७५ % , मुंबई पदवीधरमध्ये ५३.२३ % टक्के तर कोकण पदवीधर मतदारसंघात ७३.८९ % मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पावसामुळे अनेक ठिकाणी मतदारांचा उत्स्साह कमी दिसत होता. २८ जूनला मतमोजणी होणार अाहे.


युतीत रस्सीखेच

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेकडून विलास पोतनीस, भाजपकडून अमितकुमार मेहता निवडणूक लढवत अाहेत. तर शेकापचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने राजेंद्र बंडगर याना उमेदवारी दिली आहे. मुंबई शिक्षक मतदार संघात भाजपचे अनिल देशमुख,  शिवसेनेचे शिवाजी शेंडगे अाणि लोकभारतीचे कपिल पाटील यांच्यात चुरस अाहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात  ७० हजार ६३६, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १० हजार १४१ मतदार अाहेत.  कोकण पदवीधर मतदारसंघात १ लाख ४ हजार २६४ मतदार अाहेत. आमदार कपिल पाटील यांनी गोरेगावला, पदवीधर मतदारसंघाचे  लोकभारतीचे उमेदवार जालिंदर सरोदे यांनी घाटकोपरमध्ये, शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार विकास पोतनीस यांनी बोरिवलीत बाभई येथे, भाजपाचे अमितकुमार मेहता यांनी बोरीवली येथे तर शिवसेनेचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी शेंडगे यांनी चारकोप येथे मतदान केले.



हेही वाचा -

आणीबाणीत तुरूंगवास भोगणाऱ्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

काकाला पुतण्याची भीती का? रामदास कदम यांचा राजला टोला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा