Advertisement

काकाला पुतण्याची भीती का? रामदास कदम यांचा राजला टोला

काकांना पुतण्याची एवढी भीती वाटू लागली आहे का? स्वतः काही करत नाही अाणि दुसऱ्याला काही करू देत नाही, असा टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला.

काकाला पुतण्याची भीती का? रामदास कदम यांचा राजला टोला
SHARES

प्लास्टिक बंदीचा निर्णय हा नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही. याबाबत जनजागृती करण्यासाठी वेळ देऊनच निर्णय घेतला आहे. न्यायालयानेदेखील ३ महिन्यांच्या अतिरिक्त मुदतीनंतरच प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना याची कल्पना नसेल तर तो त्यांचा दोष आहे. केवळ आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घ्यायला लावला म्हणून मनसेकडून विरोध होत आहे.  

काकांना पुतण्याची एवढी भीती वाटू लागली आहे का? स्वतः काही करत नाही अाणि दुसऱ्याला काही करू देत नाही, असा टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला.


इट का जवाब पत्थरसे

राज ठाकरे यांना आधी उद्धव ठाकरे यांची भीती वाटत होती. मात्र आता अादित्य ठाकरे यांची भीती वाटायला लागली. राज यांनी वरळीतील प्रदर्शनाला भेट दिली असती तर त्यांना प्लास्टिकला बाजारात बाजारात असलेले पर्याय कळाले असते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ५ हजार रुपये दंड मागितला, तर आमच्याकडे या कारवाई करू, असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं होतं याचाही त्यांनी समाचार घेतला. जो कायदा तोडेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. इट का जवाब पत्थरसे दिया जायेगा, असा इशारा कदम यांनी मनसेला दिला.


माध्यमांचे अाभार

प्लास्टिक बंदीबाबत कदम म्हणाले की, थर्माकोलसाठी कोणालाही परवानगी दिली नाही. मच्छिमार जे थर्माकोल वापरतात त्या थर्माकोलवर बंदी नाही. मच्छिमार थर्माकोलचे बॉक्स वापरू शकतात. आमचा मच्छिमार बांधवाना त्रास द्यायचा हेतू नाही. मासे किंवा मटण आणताना घरातून डबे न्या, असं आवाहन आम्ही लोकांना करत अाहोत. सर्वांनीच प्लास्टिक बंदीचं स्वागत केलं अाहे. गणपतीच्या सणाला थर्माकोलला सूट द्यायची की नाही यावर कमिटी निर्णय घेईल, असंही कदम म्हणाले. प्लास्टिक बंदीबाबत प्रबोधन करणाऱ्या माध्यमांचेही यावेळी कदम यांनी आभार मानले


पर्यटकांकडून देखील दंड

प्लास्टिक वापरल्यास यापूर्वी २०० ते ३०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद या अगोदर केली होती. मात्र, त्या दंडाला कुणी जुमानत नव्हते. म्हणूनच ५, १० आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. अनेक राज्यात अशा दंडाची तरतूद आहे. कायद्याचा धाक असला पाहिजे. परदेशात कायदा मोडायची कुणाची हिंमत होत नाही. राज्यात येणाऱ्या पर्यटकांनी प्लास्टिक बाळगले तर त्यांच्याकडूनही दंड वसूल केला जाईल, असं रामदास कदम यांनी सांगितलं. 



 
आमचा प्लॅस्टिक बंदीला विरोध नाही. रामदास कदम यांनी अगोदर अामचे होर्डिंग वाचावे. त्यांनी त्यांच्या नेत्यांपुढे लाचारी पत्करावी. आम्हाला यामध्ये अाणू नये.
 - संदीप देशपांडे, सरचिटणीस,  मनसे



हेही वाचा -

राज्याच्या महाधिवक्त्यांनाही राज्यमंत्री पदाचा दर्जा

शहिदांच्या पत्नीला मिळणार शासकीय जमीन



 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा