चर्चा युतीची की घटस्फोटाची

  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष युतीवर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यात व्यस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. या वेळी सचिन अहिर यांनी शिवसेना-भाजपावर टीका करण्याची संधी सोडली नाही. युतीची चर्चा सुरू आहे की घटस्फोटाची तेच कळत नसल्याचा टोलाही अहिर यांनी लगावला.

  राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत 31 उमेदवारांचा समावेश असून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 27 किंवा 28 जानेवारीला पक्षाचा जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.