भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात

  Tagore Nagar
  भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात
  मुंबई  -  

  विक्रोळी - वॉर्ड क्रमांक १२०मध्ये भाजपानं आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेचे वार्ड क्रमांक १२०चे गटप्रमुख सचिन साळूंखे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबई महामंत्री नील सोमय्या, जिल्हा अध्यक्ष अनिल जोशी आणि विक्रोळी विधानसभा युवा अध्यक्ष सुमित खामकर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. आणखी काही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी संपर्कात असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.