Advertisement

भाजपच्या "झांसे की रानी" चं पितळ उघडं पडलं!- सचिन सावंत

कंगनाने आपली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर टीका करताना भाजपच्या "झांसे की रानी" चं पितळ उघडं पडलं, असा टोला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

भाजपच्या "झांसे की रानी" चं पितळ उघडं पडलं!- सचिन सावंत
SHARES

कंगना रणौतच्या पाली हिल येथील कार्यालयाच्या बेकायदेशीर बांधकामांवर मुंबई महापालिकेने बुलडोझर चढवला होता. या कारवाईवरून बरंच राजकारण झालं होतं. शिवाय कंगनाने उच्च न्यायालयात दाद देखील मागितली होती. परंतु आता कंगनाने आपली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर टीका करताना भाजपच्या "झांसे की रानी" चं पितळ उघडं पडलं, असा टोला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भाजप (bjp) नेत्यांनी बेकायदा बांधकामाला ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना समर्थक आणि महाराष्ट्रद्रोही भाजप नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

हेही वाचा- बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात कंगनाकडून याचिका मागे, पालिकेकडे केला अर्ज

कंगना रणौतच्या पाली हिल येथील कार्यालयाच्या बेकायदेशीर बांधकामांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. शिवाय, मुंबईतील खार इथल्या कंगनाच्या फ्लॅटमध्ये केलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामांबाबतही महापालिकेनं नोटीस बजावली होती. या कारवाई वरून भाजप-शिवसेना (shiv sena) असा वाद रंगला होता. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने सूडबुद्धीने कंगनाच्या बांधकामावर कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला होता.

तर दुसरीकडे कंगनाने देखील मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात याचिका दाखल करत भरपाईची मागणी केली होती. मात्र आता कंगनाने ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कंगना आता फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदेशील बांधकामांना परवानगी मिळवण्यासाठी महापालिकेकडे (bmc) अर्ज करणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत कंगनाच्या वकिलांनी ही माहिती मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. यानंतर उच्च न्यायालयानं सांगितलं की, महापालिकेला ४ आठवड्यांत कंगनाच्या अर्जावर निर्णय द्यावा लागेल, तोपर्यंत संबंधित कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.

(sachin sawant criticised bjp and kangana ranaut over illegal construction)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा