सचिन सावंत यांची भाजपावर टीका

 Pali Hill
सचिन सावंत यांची भाजपावर टीका
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक करणे हा सायबर दहशतवाद असून, याला राजाश्रय असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. तसेच मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या १० हजार कोटींच्या योजनेला सरकारनं मान्यता दिली. मुटपी ३ प्रकल्पाला नीती आयोगानं ३ अटी दिल्या होत्या. रेल्वेच्या प्रवासी तिकीट दराचा फेर आढाला घ्यावा ही त्यातली पहिली अट होती. या सगळ्याचं नियोजन करण्यात आलं का याचं सरकारनं उत्तर द्यावं अशी मागणीही सचिन सावंत यांनी केलीय.

लाभार्थ्यांना वस्तू देण्यापेक्षा त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. किती लोकांकडे बँक अकाऊंट आहेत याची माहिती सरकारनं घेतलेली नाही. तसेच ज्यांच्याकडे अकाऊंट आहेत त्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाणे कठीण झाले आहे. हे लाभ कुठल्या बँकेत मिळणार? ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँक कमी आहेत. याचा विचार झालेला नसून, याबाबत विधीमंडळात सरकारला जाब विचारणार असल्याचंही सचिन सावंत म्हणालेत.

Loading Comments