सोशल मीडियावर शिवसेनेची मोर्चेबांधणी

 Lower Parel
सोशल मीडियावर शिवसेनेची मोर्चेबांधणी
सोशल मीडियावर शिवसेनेची मोर्चेबांधणी
See all

लोअर परळ - आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यात सरशी कुणाची आणि पीछेहाट कुणाची हे कळायला अजून बराच अवधी असला, तरी प्रचारामध्ये मात्र शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं सध्या पहायला मिळतंय. सोशल साइटवर प्रचार शिवसेनेनं सुरू केलाय. यंदा युवा पिढीला संधी देण्याकडे शिवसेनेचा कल आहे. याचा प्रचार सोशल मीडियावर जोरदार होताना दिसत आहे. "कंटाळलेल्या चेहऱ्यांना आता विराम द्या, युवा पिढीला सेवेची संधी द्या " असं स्लोगन सोशल मीडियावर पोस्ट करून युवा व्होटर जमा करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे " लक्ष नाही ध्यास २०१७" अशा घोषवाक्याखाली नगरसेविका किशोरी पेडणेकर निवडणुकीच्या तयारीला लागल्यात.

Loading Comments