'मुंबई शिवसेनेची, महापौरही शिवसेनेचाच'

Mumbai
'मुंबई शिवसेनेची, महापौरही शिवसेनेचाच'
'मुंबई शिवसेनेची, महापौरही शिवसेनेचाच'
'मुंबई शिवसेनेची, महापौरही शिवसेनेचाच'
'मुंबई शिवसेनेची, महापौरही शिवसेनेचाच'
See all
मुंबई  -  

गिरगाव - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी डी विभागातील प्रभाग क्रमांक 218 ला भेट दिली. महापालिका निवडणूक जवळ आली कारणाने त्यांनी गिरगावच्या शाखेत भेटी दिल्या. त्यावेळेस त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना हे एक समीकरण आहे. गेल्या 5 वर्षात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक चांगली कामं केली आहेत. यापुढे देखील अशीच कामे करण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईत महापौर हा शिवसेनेचाच असेल असं ठाम मत मत या वेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसंच गिरगावात नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी अगणित कामं केली असून, इथल्या नागरिकांनी शिवसेनेला विकासकामांच्या परीक्षेत पास केलं असेल त्यामुळे प्रभाग क्रमांक 218 चा शिवसेनेचा नगरसेवक येथील नागरिक निश्चित निवडून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक मिनल जुवडकर यांच्या वेबसाईटचे प्रकाशन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. आदित्य ठाकरे यांनी युवासैनिकांनाही मार्गदर्शन केलं. या वेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.