पालिका निवडणुकीत एमआयएम-सपामध्ये रस्सीखेच

    मुंबई  -  

    मुंबई - महानगरपालिका निवडणुकीमध्ये या वेळी एमआयएमही रिंगणात आहे. समाजवादी पार्टी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांमध्ये मुस्लिम आणि जिंकण्याची शक्यता असलेले उमेदवार मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. एमआयएमकडून दावा केला जातोय की, इतर पक्षांतून मुस्लिम आणि दलित चेहरे एमआयएममध्ये येण्यासाठी धडपड करत आहेत. विशेषतः समाजवादी पार्टीकडून निराशा झालेले मुस्लिम स्थानिक नेते आमच्याकडे वळत असल्याचं एमआयएमकडून सांगितलं जातंय. तर दुसरीकडे एमआयएमला खिंडार पाडण्यात यश मिळाल्याचा दावा समाजवादी पार्टीचे मुंबई सचिव झुल्फिकार आजमी यांनी केलाय. मुंबईतील आग्रीपाड्यातील एमआयएम पक्षामधून 132 जण पतंग सोडून सायकलस्वार झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.