'संभाजी ब्रिगेड' राजकीय आखाड्यात

वांद्रे - पालिका निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीलाही लागलेत. त्यातच संभाजी ब्रिगेडनंही आता राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्धार केलाय. तशी अधिकृत घोषणाच त्यांनी केलीय. आधीच मराठा मूक क्रांती मोर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. त्यातच संभाजी ब्रिगेडच्या या राजकीय एन्ट्रीनं राजकीय पक्षांच्या पोटात गोळा येणार हे मात्र नक्की.

Loading Comments