डॉ. दाभोलकर ट्रस्टच्या चौकशीची मागणी


SHARE

सीएसटी - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्ध निर्मूलन समिती ट्रस्टच्या कारभारावर गंभीर आरोप सनातन संस्थेने केले आहेत. या ट्रस्टवर प्रशासक नवीन नेमावे, ट्रस्टचं ऑडिट करा, ट्रस्टवरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यानं फेरचौकशी करावी, असं साताऱ्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अधिक्षकांनी चौकशी अहवालात नमूद केलंय. या अहवालामुळे दाभोलकर कुटुंबिय आणि पुरोगामी यांच्या दबावामुळे सनातन संस्थेची चौकशी करणारे मुख्यमंत्री दाभोलकरांच्या ट्रस्टवर कारवाई करणार का, असा प्रश्न सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. ते मुंबई मराठी पत्रकार संघात बोलत होते. दाभोलकर यांची हत्या होण्यामागे त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का, याचीही चौकशी करण्याची मागणी वर्तक यांनी या वेळी केली. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सर्वप्रथम अटक केलेले नागोरी आणि खंडेलवाल यांचा सीबीआयने काय तपास केला, असा प्रश्न सनातनचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी या वेळी उपस्थित केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या