Advertisement

काँग्रेस आॅफिस तोडफोड: मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी


काँग्रेस आॅफिस तोडफोड: मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी
SHARES

मुंबई काँग्रेस ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेच्या ७ कार्यकर्त्याना शनिवारी किल्ला कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


कधी पडकलं?

शुक्रवारी सकाळी आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेसच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी या ८ जणांना शुक्रवारी संध्याकाळी अटक करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी या सगळ्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली.



आॅफिस तोडफोडीनंतर गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मनसेला जशास तसं उत्तर देण्याचं वक्तव्य केलं होतं. तसंच हा प्रकार आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या जवळच घडल्याने हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली होती.


कुणाकुणाचा समावेश?

पकडण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये संदीप देशपांडे, विशाल कोकणे, संतोष धुरी, अभय मालप, अंतोष सरोदे, दिवाकर पडवळ, योगेश छिले, हरीश सोलंकी यांचा समावेश आहे.


कुठल्या कलमांखाली अटक?

या सगळ्यांना दंगल, ट्रेसपासिंग त्याचबरोबर तोडफोड केल्याप्रकरणी (कलम 143, 147, 149, 452, 336, 427, 109, 117, 153, 120 (ब), भा. दं. वि. सह कलम 37(1), 135 मुंबई पोलीस कायदा सह 7 (1) (अ) क्रिमिनल लाॅ अॅमेंडमेंट अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा