Advertisement

वरळी विधानसभा मतदासंघात मनसेकडून संदिप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात

आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता

वरळी विधानसभा मतदासंघात मनसेकडून संदिप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात
SHARES

येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. महिन्याभरात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काहीच दिवसांपूर्वी विधानसभेच्या 225-250 जागा लढवणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान राज ठाकरेंच्या मनसेनं वरळी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे.

वरळीमधून (Worli) मनसेच्या संदिप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

संदिप देशपांडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविरोधात निवडणूक लढवू शकतात, असं बोललं जात आहे. वरळीतील रहिवासी तसेच काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर या चर्चांनी आणखी जोर पकडला आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं चांगली कामगिरी करत 9 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीनं महायुतीला चारीमुंड्या चीत केलं. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. अशा परिस्थितीत मनसेच्या संदिप देशपांडे यांना मनसेनं उमेदवारी दिल्यास मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फटका आदित्य ठाकरेंना बसू शकतो. महायुतीनं जर संदिप देशपांडेंना पाठिंबा दिला, तर ही निवडणूक निश्चितच अटीतटीची होऊ शकते.


हेही वाचा

"मणिपूरसारखी स्थिती महाराष्ट्रात होण्याची शक्यता" : शरद पवार

अमित शहांच्या शरद पवारांवरील वक्तव्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा