Advertisement

संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला

महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहे.

संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला
SHARES

महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहे. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात संजय राऊत व शरद पवार यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर वर्षा राऊत यांची दोनदा चौकशीही झाली. हे वादळ शांत होत नाही तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कधी नव्हे इतके संकटात सापडले आहे.

महाविकासआघाडीतील प्रत्येक नेत्याच्या भेटीगाठीतून कोणते ना कोणते अर्थ काढले जात आहेत. मात्र, संजय राऊत यांची ही सहकुटुंब भेट सर्वांसाठीच अनपेक्षित ठरली आहे. आता ही केवळ सदिच्छा भेट आहे की यावेळी संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये कोणती राजकीय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आतापर्यंत वर्षा राऊत यांची दोनदा चौकशी करण्यात आली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत. याशिवाय, शिवसेनेचे माजी खासदार आनंदरावर अडसुळ यांचीही ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा