Advertisement

संजय राऊत नाराज?, शपथविधी सोहळ्याला दांडी

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तार शपथविधी सोहळ्याला संजय राऊत यांनी दांडी मारली.

संजय राऊत नाराज?, शपथविधी सोहळ्याला  दांडी
SHARES

 महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तार शपथविधी सोहळ्याला संजय राऊत यांनी दांडी मारली. त्यामुळे ते नाराज आहेत, असं बोललं जात आहे. त्यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं  ते नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच सुनील राऊत राजीनामा देणार असल्याच्याही चर्चा होत आहेत. 

महाविकास आघाडी सरकार स्थापनेत संजय राऊत यांची सर्वात मोठी भूमिका राहिली आहे. भाजपाविरोधात शिवसेनेकडून राऊत यांनी किल्ला लढवला. शरद पवारांशी त्यांची असलेली जवळीक सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची ठरली. त्यामुळं सरकारमध्ये त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र, शिवसेनेने ३ अपक्षांना मंत्रीपद दिल्याने राऊत यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. शपथविधी सोहळ्याला संजय राऊत यांनी दांडी मारली. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे

शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते म्हणून संजय राऊत शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणं अपेक्षित होतं. सुनील राऊतही मुंबई बाहेर असून त्यांचा फोनही लागत नसल्याचं समजतं. कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नाराज असून राजीनामा देण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत. आता उद्धव ठाकरे त्यांची नाराजी कशी दूर करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 



हेही वाचा -

राज्यपाल के. सी.पाडवींवर संतापले, पुन्हा घ्यायला लावली शपथ

३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा